
रत्नागिरी येथील मिरकरवाडा जेटीवर आग ,दोन तात्पुरत्या शेड व टेम्पो जळून खाक
रत्नागिरीतील मच्छीमारीचे मोठे केंद्र असलेल्या मिरकरवाडा बंदरात आज पहाटे अचानक तेथे असलेल्या तात्पुरत्या उभारलेल्या शेडना आग लागली. जेटीवर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी नौका लागत असल्याने त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या शेड उभ्या केलेल्या आहेत त्यांमध्ये नौकांचे साहित्य ठेवले जाते आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला येथील मच्छीमारी साहित्य ठेवलेल्या दोन तात्पुरत्या शेडना आग लागली लोकांना समजेपर्यंत आगीने पेट घेतला होता आग विझवण्यासाठी लोकांनी धाव घेतली तसेच अग्निशामक दलाने हीआग विझवण्याचा प्रयत्न केला तो पर्यंत या आगीत दोन तात्पुरत्या उभ्या केलेल्या शेड व एक टेम्पो जळून खाक झाला ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही.
www.konkantoday.com