तिघाडी सरकारविरोधात भाजपचे तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन हाेणार


तिघाडी सरकारने राज्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करू, असे शेतकर्‍यांना दाखवलेले स्वप्न अजूनही स्वप्नच राहिले आहे. शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करू, अशीही वल्गना या शासनाने केली होती. पण अजूनही कर्जबोजा उतरलेला नाही, यादी घोषित झालेली नाही. शेतकर्‍यांची ही दिशाभूल असून रत्नागिरीतील अनेक योजना स्थगित केल्या आहेत. या शासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला असून शासनाविरोधात भाजप संपूर्ण राज्यात प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार आहे. येत्या 25 फेब्रुवारीला सकाळी 11.30 ते 2 या वेळेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे होईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपच्या जिल्हा कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे उपस्थित होते. 25 फेब्रुवारीला सकाळी 11.30 ते 2 या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. माजी खासदार भाजपा नेते नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल. धरणे आंदोलनात शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, भाजप-शिवसेनेला मिळालेला महाजनादेश झुगारून तीन भिन्न विचारसरणी फक्त सत्तेसाठी एकत्र आल्या. हे एक स्थगिती सरकार आहे. कोकणातील बहुतांश विकासकामांना स्थगिती दिल्याने कामे ठप्प झाली आहेत. विकासकामे थांबल्याने कोकणचा विकास थांबला आहे.
बांग्लादेशींवर प्रतिबंधात्मक कारवाई कधी?
टुरिस्ट व्हिसा काढून आलेले बांग्लादेशी मशिदीत राहत असून धर्मप्रसार व केंद्र सरकारविरोधी वातावरण तयार करत आहेत. बांग्लादेशी देशविरोधी व दिशाभूल करणार विधाने करत आहेत. याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी करून अद्याप राज्य शासनाने पावले उचललेली नाहीत. प्रतिबंधात्मक कारवाई कधी होणार? शासनाच्या पाठबळामुळेच कारवाई झालेली नाही. यामुळेच राज्य शासनाविरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था धोक्यात
खंडणीसारख्या गंभीर कारणासाठी गोळीबार झाल्याचे वृत्तपत्रात वाचले. रत्नागिरीसारख्या शांत शहरात हा प्रकार योग्य नाही. रत्नागिरी शहर सुशिक्षित लोकांचे आहे. या घटनेमुळे व्यापारी घाबरले आहेत. कायदा सुव्यवस्थेबाबत सरकार अपयशी ठरले आहे. अशा प्रकारे व्यापार्‍यांवर गोळीबार होणे योग्य नाही. 25 ला होणार्‍या धरणे आंदोलनात राज्य शासनाला जाब विचारू असेही ते म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button