डुबी नदीच्या पात्रातील निळीच्या डोहात गणेश विसर्जन करताना वृद्धाचा बुडून मृत्यू.
खेड तालुक्यातील खोपी-तांबडवाडी येथील जयवंत सखाराम मोरे (६०) यांचा डुबी नदीच्या पात्रातील निळीच्या डोहात गणेश विसर्जन करताना बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.मयत जयवंत मोरे पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी एकटेच डुबी नदीपात्रात गेले होते. गणरायाचे विसर्जन करण्यासाठी डोहात उतरले असता पाण्याच्या प्रवाहाचा त्यांना अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह दृष्टीस पडल्यानंतर पोलिसात कळवण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे