महापुरात लाखोंचे नुकसान, पतसंस्थेने ग्राहक आयोगाचे दरवाजे ठोठावले
पतसंस्थेला विमा दाव्याची रक्कम अंशतः अदा करून सदोष सेवा देण्यात आली. त्याची भरपाई इन्शूरन्स कंपनीने करावी असे आदेश रत्नागिरीतील ग्राहक आयोगाने दिले.२ लाख ६४ हजार रु. विमा कंपनीने अदा करावेत. मानसिक व शारिरीक त्रासापोटी २५ हजार, तक्रार अर्ज खर्चापोटी १५ हजार रू. अदा करावेत, असा निर्णय ग्राहक आयोगाने दिला. खेड येथील शिवचैतन्य पतसंस्थेने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरूद्ध रत्नागिरी येथील ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आयोगाचे अध्यक्ष अरूण गायकवाड, सदस्य स्वप्नील मेढे, सदस्या अमृता भोसले यांच्यासमोर सुनावणीस आली. चिपळूण येथे पतसंस्थेची शाखा असून जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे पतसंस्थेच्या शाखेत पाणी घुसले. फर्निचर, संगणक, तिजोरी पाण्याखाली गेल्याने १९ लाख ९९ हजार रु. नुकसान झाले. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर ७५ हजार रू. एवढी रक्कम पतसंस्थेच्या खात्यात विमा कंपनीने वर्ग केली. आणखी १ लाख ८७ हजार रू. पतसंस्थेच्या शाखेत वर्ग करण्यात आले. १७ लाख रक्कम मिळण्यासाठी पतसंस्थेने ग्राहक आयोगाचे दरवाजे ठोठावले. www.konkantoday.com