बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार,पहा व्हिडिओ. एका व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केला, पोलिसांचा तपास सुरू.
बदलापूर रेल्वे स्थानकावर आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एक खळबळ जनक घटना घडली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एका व्यक्तीने दोघांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने स्थानकात खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. गोळीबार केल्यानंतर एक व्यक्ती रेल्वे रुळावरून पळताना दिसत आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक माहिती घेतली. या घटनेमागील कारण समजून घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.