७६६ ग्रामपंचायतींच्या तिजोरीत पडणार १५ कोटी शासनाकडून निधी उपलब्ध


पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अबंधित निधीला आर्थिक वर्षातील अबंधित निधीचा पहिल्या हप्त्याचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ७६६ ग्रामपंचायतींसाठी १५ कोटी ८२ लाख ३० हजार ७८९ रुपये मिळाले आहेत. त्यामुळे ग्रामविकासाला चालना होणार आहे. जिल्हा परिषदेतून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार त्या ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येतो. चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातूनही ग्रामपंचायतींना कोट्यवधीचा निधी मिळाला होता. त्यातूनही अनेक विकासकामे करण्यात आली होती. आता केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगातून बंधित आणि अबंधित अशा दोन प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. यात ग्रामपंचायतींना ८० टक्के तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला १०-१० टक्के निधी वाटपाचे सूत्र ठरले आहे. या निधीमुळे ग्रामपंचायतींना मोठा आर्थिक बुस्टर मिळणार आहे. ज्यामुळे त्या अधिक सक्षम बनणार आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button