प्रारुप मतदार यादीत नाव नोंदणीकरिता 22 मे पासून सुरुवात


*रत्नागिरी, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार रायगड तथा रत्नागिरी तथा सिधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील द्विवार्षिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदार यादी 22 मे 2026 रोजी प्रारूप रित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची मतदार यादी जिल्हाधिकारी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात (निवडणूक शाखा) तसेच वरील जिल्हयातील जिल्हा परिषद/नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालय येथे कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारे मागणी करणेची असल्यास किंवा यादीत नाव समाविष्ट करण्याबद्दल अथवा कोणत्याही नोंदीतील तपशीलाबद्दल कोणताही आक्षेप घ्यावयाचा असल्यास अशी मागणी किंवा आक्षेप नमुना 17 मध्ये 29 मे 2026 या पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी तथा रायगड तथा सिंधुदुर्ग येथे दाखल करता येईल.
प्राप्त झालेल्या दावे व आक्षेपांवर सुनावणी 1जून 2026 रोजी घेण्यात येईल व सुनावणीअंती कार्यवाही करुन अंतिमरित्या मतदार यादी दिनांक 2 जून 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.
तरी रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील मतदारांनी या कार्यक्रमाबाबत नोंद घ्यावी.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button