एक दांडीच्या लागवडीतून आंब्याचे उत्पन्न वाढणार
हापूस आंब्याचा मोहोर दीर्घकाळ टिकून चांगली फळधारणा व्हावी यासाठी कोकणातील बागायतदारांनी त्यांच्या बागांमध्ये एक दांडी म्हणजेच दीडकाडी कांकणेन्स या वनस्पतीची लागवड केली तर चालते. रिझल्ट मिळतील असे संशोधनातून पुढे आल्याची माहिती वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगल यांनी दिली.दीप काडी कोंकणेन्स या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही प्रजात केवळ पावसाळी हंगामात बहरते. एकदांडी, गौरीची फुले किंवा ढोकाची फुले अशा स्थानिक नावांनी ही प्रजात ओळखली जाते. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, या संख्येने भरपूर प्रमाणात वाढणार्या या वनस्पतीचा बहर अनेक ठिकाणांवर नोंदवण्यात आला आहे. या प्रजातीच्या अधिवासाचा देवरूखपासून गोव्यातील मोपाच्या सड्यापर्यंत आहे. या प्रजातीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अमित मिरगल यांनी दशकभरापूर्वी दापोलीत रोपण केले होते. त्याचे रोपण यशस्वी झाले असून या संकटग्रस्त प्रजातीच्या संवर्धनाला हातभार लागला आहे. www.konkantoday.com