रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद आता अचानक वाढली, पालकमंत्र्यांच्या रत्नागिरी मतदारसंघावर ही डोळा!
* रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपचे नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात अचानक भाजपाची ताकद वाढली असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होत आहे कारण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचा गेली अनेक वर्ष असलेल्या रत्नागिरी मतदारसंघावर ही हक्क दाखवला आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे जिल्ह्यात युती न झाल्यास पाचही विधानसभा स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी आहे जर युती झाल्यास भाजपाला दोन पारंपरिक मतदारसंघ मिळाले पाहिजेत अशी ही मागणी केली आहे या पारंपारिक मतदारसंघात रत्नागिरी मतदार संघाचा ही उल्लेख होत असल्याने भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री उदय सामंत यांचा गेल्या चार निवडणुका जिंकलेला रत्नागिरी मतदारसंघावर ही डोळा असल्याचे स्पष्ट होत आहे आज भारतीय जनता पक्षाचे महा अधिवेशन रत्नागिरीत होत असून त्यामध्ये याबाबत ठराव होणार आहे असे सांगण्यात येत आहे