बॉक्साईट प्रकल्प नाणार गावात प्रस्तावित असताना या प्रकल्पाची जनसुनावणी सागवे गावात
बॉक्साईट प्रकल्प नाणार गावात प्रस्तावित असताना या प्रकल्पाची जनसुनावणी सागवे गावात घेण्यामागे प्रशासनाचा नेमका हेतू काय, असा सवाल नाणार गावचे माजी सरपंच उल्हास प्रभूदेसाई यांनी उपस्थित केला आहे. नाणार ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध असल्याने प्रकल्पग्रस्त जनसुनावणीला उपस्थित राहू नयेत, यासाठी तर ही जनसुनावणी सागवे येथे घेण्यात येत नाही ना, अशी शंकाही प्रभूदेसाई यांनी उपस्थित केली आहे.तालुक्यातील नाणार गावात, गोवा मडगाव येथील मे सोशीयेदादे दि फोमेतो इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नाणार बॉक्साईट ब्लॉक हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. नाणार गावातील १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प होणार आहे. www.konkantoday.com