
महाराष्ट्रातील आमदार-खासदारांविरोधात 404 फौजदारी खटले प्रलंबित; विशेष न्यायालयं स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!
सुप्रीम कोर्ट : महाराष्ट्र आमदार-खासदारांविरोधात 404 फैजदारी खटले अद्यापही प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींविरोधात मुंबईत 250, औरंगाबादमध्ये 110, नागपूरात 75, पुण्यात 34, ठाण्यात 32, सोलापूरात 30 तर परभणीत 28 फौजदारी खटले सुरू आहेत.
दोषी ठरवलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यावर कायमची बंदी घालण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं देशातील सर्व हायकोर्टांना लोकप्रतिनिधीं विरोधातील सर्व खटले जलद गतीनं चालवण्याकरता विशेष न्यायालयं स्थापन करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
www.konkantoday.com