
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या दरात झालेली वाढ यामुळे अर्थसंकल्पापूर्वीच खाद्यतेल कडाडले
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या दरात झालेली वाढ, खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क आणि डॉलरच्या वाढत्या किमती यांचा एकत्रित परिणाम खाद्यतेलाच्या बाजारावर दिसून आला आहे. दरम्यान आगामी अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार असून, यापूर्वीच खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ होत असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेले खाद्यतेलाचे भाव अचानक वाढले आहेत. सण-उत्सव नसतानाही झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे. विशेषतः शेंगदाणा तेलाच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. शेंगदाणा तेल २०० रुपये किलोवर पोहोचले आहे.
www.konkantoday.com




