पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दोन बंगल्यावर दरड कोसळली, घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता
_पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर दरड कोसळली. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हाच प्रशासनाला देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे दोन बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या बंगल्यामध्ये राहणारे २ ते ४ जण बेपत्ता झाले असल्याची माहिती स्थानिक नागिरकांनी दिली. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. या घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.