राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. राम मंदीराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अयोध्येत श्रीराम मंदिर भुमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. राममंदीराचा शिलान्यास आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. अयोध्येचं अर्थतंत्र बदलेल, अनेक संधी उपलब्ध होतील. संपूर्ण जगातील लोक प्रभु रामाचं दर्शन घेण्यासाठी येतील. सर्वोच्च न्यायालयाने सर्वांच्या भावनांचा आदर राखत निर्णय दिला. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपतींना साथ दिली, समाजातील सर्व वर्गाने गांधीजींना पाठींबा दिला त्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून राम जन्मभुमीचं कार्य पार पाडल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button