
शिरगाव जिल्हा परिषद गटातर्फे काँग्रेस पक्षाचा मेळावा
शिरगाव जिल्हा परिषद गटातर्फे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाचा मेळावा यशस्वीपणे पार पाडला. या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सामाजिक न्याय विभागाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महादेव चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य मैनुद्दीन सय्यद, जिल्हा सरचिटणीस कैसर देसाई, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते यश पिसे तसेच जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा रवीना गुजर, तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, नंदा भालेकर, वर्षा खटके, स्नेहा ओतारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अशोकराव जाधव यांचा जिल्हा परिषद गटातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा आणि दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्तकरून काँग्रेस पक्षाचे धोरण आणि सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा पर्दाफाश करून भविष्यात काँग्रेस पक्षाचा हात मजबूत करण्याचे आवाहन केले. या वेळी रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अल्पेश मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन स्थानिक तरूणांनी युवक काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला तसेच काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहू, असा आशावाद व्यक्त केला.