गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात बसवणार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोनोग्राफी मशीन शुक्रवारी लांजा येथील संकल्प सिध्दी पोलीस सभागृहात जनता दरबार रत्नागिरी, दि. 24 (जिमाका) : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक, येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 6.10 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 7.30 वाजता ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बसविण्याबाबत (संगमेश्वर, पाली व राजापूर) (स्थळ : जिल्हा शासकीय रुग्णालय ) सकाळी 8.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील अडी-अडचणींबाबत (स्थळ : जिल्हा शासकीय रुग्णालय) सकाळी 9.30 वाजता मा.मुख्यमंत्री महोदयांचे नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामांचे भूमीपूजन / उद्घाटन कार्यक्रमांचा आढावा (रत्नागिरी विमानतळ टर्मिनल इमारत भूमीपूजन, विमानतळ रस्ता, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन व १५ ऑगस्ट २०२४ रोजी होणारे विविध विकासकामांचे भूमीपूजन / उद्घाटन) (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय ) सकाळी 11 वाजता पंचायत समिती रत्नागिरी, दामले विद्यालय व न.प. अंतर्गत सर्व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “शिक्षण सप्ताह” सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह) दुपारी 12.30 वाजता हातिस येथील ग्रामस्थांसमवेत चर्चा (स्थळ : हातिस, ता.जि.रत्नागिरी) दुपारी 1.30 वाजता म्हाबळे येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : म्हाबळे, ता. जि. रत्नागिरी) दुपारी 2.30 वाजता परचुरी येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : परचुरी, ता.जि.रत्नागिरी) दुपारी 3.30 वाजता फुणगुस येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : फुणगुस, ता.जि. रत्नागिरी) सायंकाळी 5.30 वाजता कोंड्ये येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : कोंड्ये, ता.जि.रत्नागिरी) सायंकाळी 7.30 वाजता रत्नागिरी शहर, प्रभाग क्र.१४ आढावा बैठक. (स्थळ : रत्नागिरी जिल्हा तेली समाज संघ सभागृह, तेली आळी) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे राखीव. शुक्रवार 26 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने लांजा कडे प्रयाण. सकाळी 9.30 ते दुपारी 12 वा. जनता दरबार (स्थळ : संकल्पसिध्दी हॉल (पोलीस सभागृह), लांजा) दुपारी 2 वाजता वरवडे येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : वरवडे, ता.जि.रत्नागिरी) सायंकाळी 4 वाजता मालगुंड येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : मालगुंड, ता.जि. रत्नागिरी) सायंकाळी 5 वाजता कोतवडे येथील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : कोतवडे, ता. जि. रत्नागिरी) सायंकाळी 7.30 वाजता रत्नागिरी शहर, प्रभाग क्र. ४. आढावा बैठक (स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, कोंकणनगर ) सोईनुसार रत्नागिरी येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण.000