वाटद एमआयडीसी हद्दपार करणार ,शपथ घेऊन ग्रामस्थांचा निर्धार

वाटद पंचक्रोशीत एमआयडीसी शंभर टक्के नको .ही एमआयडीसी रद्द होईपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू असा निर्धार वाटद पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी घेतला. यासाठी लढण्याची शपथ सर्वांनी घेतली. जमीन ही आमची आई आहे. मिरजोळे येथील एमआयडीसीत अनेक जागा रिकामी आहे तिथे कारखाने चालत नाहीत. एमआयडीसीच्या प्रदूषणामुळे त्वचा रोग, श्वसनरोग तसेच कर्करोगासारखे दुर्धर आजार जडलेले रुग्ण लोटे व नागोठणे एमआयडीसी परिसरात पहायला मिळत आहेत. यामुळेच या एमआयडीसीला आमचा विरोध आहे या विरोधात सह्यांची मोहीम हाती घेणार येणार आहे हा लढा गांधी मार्गाने लढण्यात येईल एमआयडीसी पेक्षा प्रशासनाने इथल्या शेतकऱ्यांना पाचशे एकर जमीन द्यावी त्या जागी शेतीच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्न घेऊन आम्ही दाखवतो अशी ग्रामस्थांनी सभेत सांगितले. या प्रकल्पाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणेत देणार आहे .
__________________________

माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button