मुंबईच्या मुलुंडमध्ये भरधाव ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली
_मुंबईतल्या वरळीमध्ये ऑडी कारने दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये भरधाव ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघाताचा तपास मुलुंड पोलिसांकडून सुरू आहे.