सरकार किती नाकर्ते आहे, याचे प्रशस्ती पत्रक म्हणजे मुंबई गोवा महामार्ग-भास्कर जाधव यांची टीका
मुंबई-गोवा महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर शाब्दिक हल्ला केलाय. मुंबई गोवा महामार्ग हा भाजपच्या कामाची पोचपावती आणि कामाची क्षमता दाखवणारा महामार्ग आहे.नितीन गडकरी केवळ चांगले भाषण करतात,त्यांची भक्त भाषणे ऐकावीत. सरकार किती नाकर्ते आहे, याचे प्रशस्ती पत्रक म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आहे. हे सरकार किती निकम्म, तकलादू, ढोंगी, निकामी आहे हे हा रस्ताच सांगेल, असे भास्कर जाधव म्हणाले. ते कोकणात बोलत होते.