मुलं आणि पालक यांच्यातील चुकलेला संवाद‎ :- सिमाली भाटकर-गंधेरे, रत्नागिरी

आधुनिकीतेच्या जगात व्यस्त होते सगळे, बोलण्याचे साधन जिथे दूरध्वनी बनले, थकले जीव जेव्हा घरट्याकडे परतले, पिल्लांपाशी बागडण्या ऐवजी मोबाइलमध्ये गुंतले…१.

ममता- माया, पाळणाघरे वा आयांपाशी थांबले, भक्कमतेच्या सावल्यांना वृध्दाश्रमात नेऊनी बसविले आणी आधुनिक युगात कुटुंबाचे रुपच पालटले, आशा अन् अपेक्षाच्या ओझ्यानं कुणी प्राणास मुकले…२.

दडपशाहीच्या भावनेनं विक्षिप्तावाणी एकटे होऊन पडले, जुन्या सोबत नवं स्वीकारतांना बालपण हरवले, नात्यांचे पाश आता स्पर्धेत रंगले जिंकण्याच्या आशेत आपलेपणाने खेळणं विसरले…३.

तू तू मी मी करता करता पाखरांच्या भांडणात पिल्लांचे अस्तित्व हरवले,  स्वातंत्र्याचे अर्थ स्वैराचारात बदलले, आणी मोकळे पणाने जगण्यांचा आनंद घेणं विसरले…४.

माझ्या वरील कवितेच्या माध्यमातून मला एवढेच सांगायचे आहे,मुले ही देवाघरची फुले आहेत.त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.त्यांच्या सोबत लहान होऊन जगा,त्यांच्याशी बोला.तुम्हांलाही तुमचे बालपण परत मिळेल.धाक हा डोळ्यात असावा व प्रेम हे वाणीत असले पाहिजे.काही पालक आपल्या मुलात सुधारणा व्हावी म्हणून कधी कधी  त्यांना मारतात.मला कोणत्याही चुकीचे समर्थन करायचे नाही.पण मुलांना मारणे ही त्यांच्या चुकीची शिक्षा वा दंड नाही तर त्याने ती चुक का केली हे समजून घेऊन त्याला समजावून सांगणे जेणेकरुन तो चुक परत करणार नाही.जगण्याचं कौशल्य शिकणे हिच आजच्या काळाची गरज आहे.तरच तुम्ही आनंदाने सुखी जीवन जगू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button