
विनापरवाना ट्रकमधून ७४ प्रवाशांची वाहतूक करणारा ट्रक चालक ताब्यात
रत्नागिरी जिल्ह्यात कोराेनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यामुळे जिल्हा बंदी व तसेच मालवाहतुकीच्या गाड्यातून प्रवासी वाहतुकीला बंदी आहे असे असताना देखील गावी परतण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करीत आहेत रत्नागिरीत ते मध्य प्रदेश असा विनापरवाना कोणताही पास नसताना जाणारा ट्रक राजापूर हातिवले नाक्यावर पोलिसांकडून अडवण्यात आला त्यावेळी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ७४ प्रवासी आढळून आले पोलिसांनी ट्रकचा चालक विजय काेल राहणार मध्य प्रदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com