उद्धव ठाकरे यांचे जवळ कार्यकर्ते नसल्यामुळे आघाडीशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही,- उदय सामंत
_उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी की युती करावी हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकते, त्यामुळे कदाचित २८८ मतदारसंघांमध्ये आपल्याला उमेदवार मिळतील की नाही याची चिंता असल्यामुळे ते चाचपणी करत असतील.मात्र त्यांच्याजवळ कार्यकर्ते नसल्यामुळे आघाडीशी जुळवून घेण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.उदय सामंत नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांना राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी केल्यावर त्यांना त्यांचा पक्ष कुठे आहे ते कळेल असेही सामंत म्हणाले. विशालगडाच्या बाबतीत जातीपातीचे राजकारण करण्यात अर्थ नाही. अनधिकृत बांधकामामुळे झालेला तो उद्रेक होता. निवडणूक आल्या म्हणून जातीपातीचे आणि धर्माचे राजकारण करून काही राजकीय पक्ष महाराष्ट्र भडकवण्याचे काम करत आहे, ते करू नये असेही सामंत म्हणाले.