
महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे जलतरण पटूंची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड
सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या या शालेय विभाग स्तरीय जलतरण स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.करण महेश मिलकेने पन्नास मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक मिळविला तर शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक ,पन्नास मीटर फ्रिस्टाईलमध्ये तृतीय क्रमांक मिळाविला,तनया महेश मिलके हिने पन्नास मीटर ब्रेस्ट स्टाेक प्रथम क्रमांक तर शंभर मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला श्रावणी स्वप्नील खटावकर हीनेशंभर मीटर बटरफ्लायमध्ये द्वितीय व पन्नास मीटर बटरफ्लायमध्ये तृतीय क्रमांक मिळविला ,
महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या घ्या तीन खेळाडूंनी विशेष नैपुण्य दाखवून स्पर्धेत आपले नाव कमावले संपादन केले याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे या सर्वांची आता नागपूर येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड झाली आहे या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय जलतरणपटू महेश मिलके यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले आहे यातील करण मिलके हा गोगटे जोगळेकर ज्युनिअर कॉलेजचा,तनया मिलके ही शिर्के स्कूलची,श्रावणी खटावकर ही पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस रत्नागिरी करानी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.konkantoday.com