छगन भुजबळ आज(सोमवारी) सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आज(सोमवारी) सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले.छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.