ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन.

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती आणि त्यांची ट्रिटमेंट देखील सुरू होती.पण आज 14 ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं.बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं. शिवाय चित्रपटात देखील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका गाजल्या. अतुल परचुरे यांची ‘जागो मोहन प्यारे’ ही मालिका ही हिट ठरली, ज्यामुळे ते लोकांच्या घरोघरी पोहोचले.अतुल परचुरे हे त्यांच्या विनोदी पात्रांसाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक कॉमेडी टायमिंगने त्यांनी लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. पण लोकांना हसवणारा या कलाकाराने मात्र आज त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button