रत्नागिरीतील दुकानदारांवर अन्न प्रशासन विभागाकडून कारवाई,दुकाने बंद करण्याचे आदेश

अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी कार्यालयातर्फे शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघनकरणा-या मिठाई विक्रेते, किराणा दुकान इत्यादी आस्थापनांवर कारवाई घेण्यात आली.त्यामध्ये सदर कारवाईमध्ये हिरापन्ना मिठाईवाला, मारुती मंदीर चौक, रत्नागिरी व त्याजवळील एक हॉटेल यांचेकडून
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने आस्थापना बंद करण्याचे निर्देश देऊन प्रत्येकी रु. ११,०००/- दंड वसूल करण्यात आला.
तसेच तेथील गजानन स्वीट्स अँड कोलड्रिंक्स येथे ग्राहकाची गर्दी आढळून आल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्याचप्रमाणे एस. टी. स्टॅड जवळील राधेश्याम स्वीटमार्ट, रुची स्वीटमार्ट व स्वरूप स्वीटमार्ट यांचेकडे आढळून आलेल्याउल्लंघनामुळे दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे हनुमान स्वीटमार्ट, गोखले नाका, रत्नागिरी यांचेकडूनही
नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.आज तहसीलदारांकडून अचानक आदेश काढल्याने मिठाई व नाशवंत असलेल्या दुकानदारांवर कारवाई करू नये त्यांना आजदुकाने उघडी ठेवण्यास द्यावीत असे आदेश उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले होते तरीदेखील कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सदरची कारवाई मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखालीघेण्यात आली असून यापुढेहही अशाच प्रकारची कारवाई घेण्यात येणार असल्याचे श्री. नारागुडे, सहा. आयुक्त (अन्न), अन्न व औषध
प्रशासन (म. रा) यांनी सांगून सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न पदार्थ पुरवठा करताना त्यांचे कर्मचा-यामार्फत होम डिलिव्हरीचा पर्यायवापरावा व होम डिलिव्हरी देणा-या व अन्न पदार्थ हाताळणा-या कर्माचा-याचे RTPCR ची चाचणी किंवा लसीकरण करून घेणेबंधनकारक असल्याचे सांगून सर्व व्यवसायिकांनी वरील तरतुदीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button