पेडणे बोगद्यात पाणी भरले जमिनीतून पाणी वर येत असल्याचा पहा व्हिडिओ, वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू
गेले चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गोवा राज्यातील मालपे (पेडणे-गोवा) टनेल मध्ये पाणी व चिखल भरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहे
पेडणे गोवा मालपे या ठिकाणी पूर्वी एकदा असाच प्रकार घडला होता. आता रूळावर खालून पाणी येत आहे. सध्यस्थीतीत गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गमधील काही स्थानकात थांबवून ठेवल्या आहेत तर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या गोव्यात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. तर मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या वळवण्यात आले आहेत टनेल मध्ये सध्या रेल्वेचे इंजिनिअर व कर्मचारी काम असून ते युध्दपातळीवर रेल्वे मार्ग मोकळा होईल असे प्रयत्न केला जात आहे. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आणि अभियंता मालपे गोवा येथे उपस्थित आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रवासी वाहतूक लवकरच सुरू करण्यासाठी कोकण रेल्वेचे अभियंता प्रयत्न करत आहेत. तसेच कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक घटनास्थळी पोहोचले आहेत.
www.konkantoday.com