
रत्नागिरी शहर भाजपातर्फे महिला दिन कार्यक्रम सुषमा शेट्ये पैठणीच्या विजेत्या
९ मार्च /रत्नागिरी* : भाजप शहर व दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चातर्फे महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा, हेअर स्टाईल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फनी गेम्सचे आयोजन भाजपा कार्यालय व गुरुकृपा मंगल कार्यालयात केले. पैठणीचा मान सुषमा शेट्ये यांनी पटकावला. उपविजेत्या स्मिता मोरे यांना तनमणी, आणि आदिती शिरधनकर यांना नथ बक्षीस म्हणून देण्यात आली. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी, दि यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवी माने आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले.भाजपा कार्यालयात रांगोळी व हेअर स्टाईल स्पर्धा झाली. सायंकाळी गुरुकृपा मंगल कार्यालयात डॉ. प्रीती मुळ्ये यांनी महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, मोदी सरकारच्या विविध योजनांबाबत प्रश्नोत्तर, शब्द कोडी हा कार्यक्रम घेतला. त्यानंतर पैठणी खेळ रंगला. त्याचे निवेदन, आयोजन राधा तोडणकर हिने केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला विशेष कार्यकारी अधिकारी यांचे सत्कार करण्यात आले.शहराध्यक्ष पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वात या स्पर्धांचे नियोजन केले. ओबीसी जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, प्रणाली रायकर, मानसी करमरकर, जिल्हा उपाध्यक्ष ऐश्वर्या जठार, जिल्हा खरेदी विक्री संघ संचालिका ऋतुजा उमेश कुळकर्णी, शहर सरचिटणीस सोनाली आंबेरकर, रेशम तोडणकर, सायली बेर्डे, श्वेता सुशांत चवंडे ,वर्षा ढेकणे, तनया शिवलकर विशेष उपस्थित होत्या. कार्यक्रमाला माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगरसेवक राजू तोडणकर, मून्ना चंवडे , सचिन करमरकर यांनी शुभेच्छा दिल्या.*स्पर्धेचा निकाल*रांगोळी स्पर्धा- गौरी शेट्ये, मुग्धा साळवी, निकिता जगताप, अन्वेक्षा आखाडे. हेअर स्टाईल स्पर्धा- काजल मयेकर, उर्वी गोळपकर, नीलम पारकर. या स्पर्धांचे परीक्षण आर्या ब्युटी केअरच्या संचालिका मेधा कुळकर्णी यांनी केले. या सर्व खेळांमध्ये सुमारे दीडशे महिलांनी सक्रिय भाग घेतला.




