
चिंचघर–भुवडवाडी येथील मानवी वस्तीत घुसलेल्या मगरीला वनविभागाच्या पथकाने जीवदान दिले
खेड तालुक्यातील चिंचघर–भुवडवाडी येथील मानवी वस्तीत घुसलेल्या मगरीला येथील वन्य विभागाच्या वन्यजीव रक्षकांनी सुखरूप ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले.
चिंचघर–भुवडवाडी येथे मगर घुसल्याची माहिती विकी कदम यांनी येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. मगरीचा बचाव करण्यासाठी वन्यविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. चिपळूण वनविभागाने नव्याने विकसित केलेल्या लोखंडी पिंजऱ्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या मगरीला ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले. बचाव पथकात वनपाल
सुरेश उपरे, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, रानबा बंबर्गेकर, अशोक ढाकणे, वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, सुरज जाधव, सुमित म्हाप्रळकर यांचा समावेश होता.
www.konkantoday.com