
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नोंदणीसाठी शुक्रवारी गुहागरात मेळावा
रत्नागिरी, दि. 27 :-केंद्र शासनाच्या एम.एस.एम.ई विकास कार्यालय, भारत सरकार, मुंबई व राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक शिल्पकार व कारागिरांच्या मदतीकरिता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे व नोंदणी करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता गुहागर येथील श्रीमती के. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, भंडारी भवन, कीर्तनवाडी रोड, मराठी शाळा क्र-1 च्या समोर, गुहागर स्टॅन्डजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
योजनेच्या नोंदणीसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ पारंपरिक शिल्पकार व कारागीरांनी घ्यावा, असे आवाहन एम.एस.एम.ई. कार्यालय, मुंबई व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तथा सदस्य सचिव पी.एम.विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना एस.जी. कोलथरकर यांनी केले आहे.