मोडी लिपी अक्षर ओळख

पुणे:-छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध लिपी आहे. इतिहासातील अनेक लिखित कागदपत्रांमध्ये बंद असलेला इतिहास वाचण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही लिपी शिकणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. या उद्देशाने रविवारी (ता. २८) मोडी लिपी अक्षर ओळख कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मोडी लिपीचा इतिहास मूलभूत ज्ञान, मोडी लिपी अक्षर ओळख तसेच प्रिंटेड व इ-पुस्तकांसोबत लेखन व वाचन सरावाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ही कार्यशाळा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. मोडी लिपीमध्ये लिहण्याची वाचण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.संपर्क : ९३५६९७३४२७www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button