सावर्डे येथे प्रत्यक्ष वायनरी वरील प्रशिक्षण शिबिर !

इटली , फ्रान्स या देशात छोट्या छोट्या वायनरी आणि सोबत पर्यटन असे वायनरी पर्यटन विकसित झाले आहे .आपल्या महाराष्ट्रात सुला वाईनने हे नाशिक मध्ये भव्य प्रमाणात यशस्वी केले आहे .
कोकणात प्रमूख पर्यटन केंद्र तारकर्ली , गणपतीपुळे , दापोली , श्रीवर्धन , अलिबाग , अर्नाळा , केळवा , बोर्डी …ई ठिकाणी पर्यटनाला वाईनरी टुरिझम ची जोड दिली या परिसरात छोट्या छोट्या वायनरि सुरु केल्या तर आंतरराष्ट्रीय पर्यटक कोकणात आकर्षित होतील व नवी अर्थव्यवस्था उभी राहील . आता राज्य सरकारने जवळपास शून्य excise tax केल्यामुळे हा उदयोग micro winary गावागावात उभारणे शक्य आहे .
हा उदयोग ज्यांना आपल्या गावात सुरु करायचा आहे असे निवडक 20 भावी उद्योजक कोकण क्लब आणि सावर्डे फ्रूट फाउंडेशन वायनरी प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले आहेत .दोन दिवस हा कार्यक्रम सावर्डे सह्याद्री शिक्षण संस्था येथे प्रत्यक्ष वायनरी प्रकल्पावर सुरु आहे . वाईन expert नीलेश लेले आणि सई निकम हे या उद्योजकांना मार्गदर्शन करीत आहेत . भविष्यात कोकणात विशेषतः पर्यटनाच्या गावागावात वायनरि उभ्या रहाव्यात असा कोकण क्लब जिवन शिक्षण प्रबोधिनीचा प्रयत्न आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button