
जत्रा – मेगा ट्रेड फेअर आणि मराठी फूड फेस्टीवल -2025

इंदौर, मध्यप्रदेश येथे मराठी सोशल ग्रुप ट्रस्ट तर्फे आयोजित “जत्रा – मेगा ट्रेड फेअर आणि मराठी फूड फेस्टीवल -2025” या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी भेट दिली.

मराठी परंपरा, संस्कृती आणि चवींचा सोहळा अशा या मेळाव्यात मराठी बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. अशा उपक्रमांमधून मराठी संस्कृतीचा झेंडा देशाच्या कानाकोपऱ्यात फडकत राहो, या शुभेच्छा मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी बोलताना दिल्या.

या प्रसंगी माजी लोकसभा सभापती सौ. सुमित्राताई महाजन, शिवसेना सचिव श्री. संजय मोरे, मराठी सोशल ग्रुप ट्रस्ट अध्यक्ष श्री. सुधीर दांडेकर, सचिव तृप्ती महाजन, श्री. राजेश शहा, श्री. मंदार महाजन तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.





