
कोयना धरण परिसरात २.९ रिश्टर स्केलचा भूकंप
काल रविवारी रात्री ९.३४ वाजता कोयना धरण परिसरात २.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सातारा, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवला. याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १६.८ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात जावळे गावच्या पश्चिमेला चार किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना भूकंप माहिती केंद्रावरून देण्यात आली. या भूकंपात कोणतीही वित्त हानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षीत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.हा भूकंप कोयना, पाटण, पोफळी आदी सातारा, रत्नागिरी जिल्हा व वारणा खोऱ्यासह सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जाणवला
www.konkantoday.com