मृत अनोळखी व्यक्तीविषयी संपर्क करण्याचे आवाहन

* रत्नागिरी, दि. 4 (जिमाका) : शासकीय रुग्णालयाच्या आयसीयु विभागाच्या पोर्चमध्ये 25 जून रोजी 10 च्या सुमारास अनोळखी व्यक्ती बेशुध्द अवस्थेत सापडली. अनोळखी व्यक्तीला दुपारी 3.30 वाजता मृत घोषित करण्यात आले आहे. या अनोळखी मृत पुरुषाचे वय अंदाजे 45 वर्षे, उंची 5 फुट, अंगाने सडपातळ, दोन्ही कानात पांढरट रंगाचे धातुची बाली आहे. उजव्या हाताच्या मनगटावर साईराम गोंदलेले आहे. उजव्या हाताच्या मागच्या बाजुस M गोंदलेले आहे. उजव्या हाताचे मनगटात भगव्या रंगाचा दोरा बांधलेला आहे. अंगात हिरवे काळे आडवे पट्टे असलेले शर्ट, नेसणीस काळपट राखाडी रंगाची फुल पॅन्ट आहे. मृत अनोळखी पुरुष व्यक्तीचा नाव, पत्ता समजून येत नाही. सदर अनोळखी मृत पुरुष व्यक्तीस कोणीही ओळखत असल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे दु.क्र.02352-222333 किंवा मो.क्र.7021891931 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button