दोन हस्तीदंत जवळ बाळगल्याप्रकरणी मंडणगड येथील तरुणाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

दोन हस्तीदंत जवळ बाळगल्याप्रकरणी मंडणगड येथील तरुणासह रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील – एकाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक स्कूटर, २ मोबाईलसह १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आकाश प्रकाश पवार (२८, रायगड, माणगाव), नितीन विलास धामणे (२६, मंडणगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात दोन तरुण हस्तीदंत घेऊन येणार असल्याची खबर मानपाडा पोलिसांना मिळाली.

यानुसार मानपाडा पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत मानपाडा पोलिसांनी ३९ सेंटीमीटर व ८ सेंटीमीटरचे दोन हस्तीदंत ताब्यात घेतले आहेत. त्यातील एकाची गोलई २२ सेमी, तर दुसऱ्याची २१ सेमी आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९,३९,४४,४९ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button