प्रतापगडावर नमो पर्यटन माहिती केंद्र उभारणार


गडकिल्ल्यांचा इतिहास राज्यातील विशेष करून तरूण पिढीला उलगडावा यासाठी गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्राच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व, किल्ल्यांवर झालेल्या लढाया, किल्ल्यांचा पराक्रम याचा उलगडा होणार आहे. प्रतापगड, रायगड, शिवनेरी आणि साल्हेर या किल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार असून प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यावर केंद्र उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
गडकिल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासह पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील यांनी सांगितले.
बी. एन. पाटील म्हणाले, प्रतापगड, रायगड, शिवनेरी आणि साल्हेर या किल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार असून प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यावर केंद्र उभाणीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनक्षेत्राला नवी गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन विभागाच्या वतीने प्रतापगड, रायगड, शिवसेने आणि साल्हेर या चार ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरात नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button