मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना त्यांनी आणावी, या ठाकरे यांच्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.ते म्हणाले, की आम्ही लेक लाडाची योजना आणलीच. लाडकी बहीण-लाडका भाऊ योजनाही आणू.पण हे बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत, त्यांनी विचार करावा, आत्मपरीक्षण करावे. सगळे भाऊ का गेले, असे खोचक व जिव्हारी लागणारे प्रत्युत्तर ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले, की ठाकरे यांचे सरकार आजारी सरकार होते. आता कामाच्या जिवावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून जिंकणार आहोत.www.konkantoday.com