लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी सुरुवात सरासरी 12. 65 टक्के मतदान

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी ता.6 एप्रिलला देशातील 51 मतदारसंघांमध्ये मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, आणि जम्मू- काश्मीर या सात राज्यांमध्ये हे मतदान होत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत 12. 65 टक्के मतदान झाल्याची माहीती आहे.काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह 674 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पुलवामा येथील रोहमू गावातील मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला झाला आहे, कुणीही जखमी नाही. मायावतींनी लखनौमध्ये मतदानाचा हक्क बजावला. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सपत्निक लखनौमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर एनडीएलला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, तसेच नागरिकांना मतदान करण्याचेही आवाहन केले.

सकाळी दहा वाजेपर्यंतची टक्केवारी(सरासरी- 12.65 टक्के)

बिहार- 11.51, जम्मू आणि काश्मीर-1.36, मध्यप्रदेश- 13.18, राजस्थान-14, उत्तर प्रदेश-9.85, पश्चिम बंगाल-16.56, झारखंड- 13.46

Related Articles

Back to top button