
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुतर्फा प्रवासात गळतीचे विघ्न
मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यातून दुतर्फा प्रवास सुसाट अन आरामदारी झाला असला तरी गळतीचे विघ्न निर्माण झाल्याने वाहन चालकांचा जीव टांगणीवर आहे. ६ ते ७ ठिकाणी लागलेली गळती थोपविण्यासाठी पत्र्यांचा आधार घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी पाहणी करत ठोस उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सूचित केले. यापूर्वी बोगद्यातून मार्गस्थ होणार्या वाहनांवर पाण्याचा अभिषेक होत होता. याबाबत संवादने वस्तुस्थिती समोर आणली होती.मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला कशेडी बोगदा आतापासूनच मसस्यांच्या गर्तेत अडकला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक व्यवस्थेतील विस्कळीतपणा दूर झालेला असतानाच गळतीचा अडसर उभा ठाकला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे कशेडी बोगद्यातून सहा ते सात ठिकाणी गळती सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या गळतीमुळे कशेडी बोगद्यातून मार्गस्थ होताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.www.konkantoday.com