मत्स्य टंचाईमुळे भाजीबरोबर सुक्या मच्छीचे दरही वाढले
महागलेली भाजी व दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात मासेमारीवर आलेली शासकीय बंदी यामुळे सुक्या माशांच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. यामुळे कधी नव्हे एवढा सुक्या माशांच्या दराने यंदा चांगला भाव खाल्लेला दिसून येत आहे. एकूणच सर्व प्रकारच्या मासळीमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ दिसून येत असून सोडे दीड हजार रुपये किलो दराने विकले जात आहेत.www.konkantoday.com