चिपळूण एसटी स्टँडवर संतप्त झालेल्या प्रवाशाने वाहतूक नियंत्रकास शिवीगाळ करत सरकारी मालमत्तेचे केले नुकसान..

चिपळूण एसटी स्टँडवरील कंट्रोल रूममध्ये एका प्रवाशाने गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेमिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:२० च्या सुमारास घडली. चिपळूण रेल्वे स्टेशन ते चिपळूण एसटी स्टँड या बसने आलेल्या मंगेश मनोहर चव्हाण (वय २९, रा. भोम) या प्रवाशाने बसमध्ये गर्दी असल्याच्या कारणावरून रागाच्या भरात कंट्रोल रूम गाठली. तिथे कर्तव्यावर असलेले वाहतूक नियंत्रक विनायक भास्कर कुसाळकर (वय ५५) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपीने विनाकारण शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

आरोपीचा राग एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने रागाच्या भरात कंट्रोल रूमची दर्शनी काच हाताने फोडून टाकली. तसेच तेथील कॉम्प्युटरला जोराचा धक्का देऊन तो खाली पाडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. या गोंधळामुळे शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. या घटनेत सचिन परशुराम तटकरे (वय ३२) हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button