
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत
रत्नागिरी : सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (३ जानेवारी) रत्नागिरीत येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी दिली.
रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर येथील जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री स्वतः रत्नागिरीत येत असून, शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या शेजारी उपमुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.




