हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्याने कुंभार्ली घाटाचे रुपडं नव्या वर्षात पालटणार


कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या कुंभार्ली घाटासह पिंपळी व रामपूर उक्ताडदरम्यान एकूण ३६ कि.मी. रस्त्याची मालकी आत्ता राष्ट्रीय महामार्गकडे अधिकृत रित्या आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या ताब्यात असलेल्या गुहागर-विजापूर मार्गाच्या रस्त्याची हस्तांतरण प्रक्रिया तब्बल ११ महिन्यांनंतर पूर्ण झाली नोव्हेंबर महिन्यात अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यानंतर सूत्रे हाती घेतलेल्या महामार्ग विभागाने दुरुस्तीला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने नव्या वर्षात कॉंक्रिटीकरणासह सुरक्षेचा मार्गही मोफळा झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुहागर विजापूर राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचे जाहीर केल्यानंतर ३ जानेवारी २०१७ रोजी त्यावर अंमलबजावणी होऊन या मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाने सातारा जिल्ह्यातील आपल्या ताब्यात असलेला रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून त्याची विकासात्मक कामेही हाती घेतली. मात्र रत्नागिरी जिल्हयातील हस्तांतरण रखडले होते. कुंभार्ली घाट माव्यापासून ते गुहागरपर्यंतच्या या मार्गात दोन ठिकाणचा रस्ता यापूर्वीच महामार्गाकडे वर्ग झाल्यानंतर त्याचे कॉंक्रिटीकरणासह रुंदीकरण पूर्णत्वास गेले. रस्ता हस्तांतरणाबाबत गेल्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाल्यानती यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात महामार्गी पाहणीसाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रत्नागिरी येथील बैठकीत सादरीकरणावेळी चर्चा होऊन रस्ता हस्तांतरणाबाबत निर्णय झाला होता.
त्यानुसार आता सार्व. बांधकाम मंडळाने गुहागर-विजापूर महामार्गतील आपल्या ताब्यात असलेला कुंभार्ली घाटमाथा ते पिंपळीदरम्यानचा २१ कि.मी. व रामपूर ते चिपळूण बायपासदरम्यानचा १५ कि मी. असा ३६ कि.मी.चा रस्ता महामार्गकडे गेल्याच महिन्यात हस्तांतरित केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button