आरजू टेक्सोलने रत्नागिरीतील अनेक गरजुना कोट्यावधी रुपयांना फसवले, तक्रारींचा आकडा ९०३ च्या वर
स्वयंरोजगारासाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवणार्या आरजू टेक्सोल कंपनीविरोधात एका दिवसात ५२ गुंतवणुकदारांनी तक्रार केल्या आहेत. त्यामुळे तक्रारीचा आकडा ९०३ वर गेल्याचे समजते. यामध्ये करोडो रुपयांची गुंतवणुकदारांची फसवणूक झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आले आहे.गुन्हा दाखल झालेल्या संजय गोंविद केळकर कारवाईपूर्वीच रूग्णालयात दाखल झाला आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात गरजुना चुना लावल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडे हा तपास गेल्यानंतर एका दिवसात १२ तक्रारदारांनी तक्रारी दिल्या आहेत. कंपनीविषयी एकेक माहिती पुढे येत आहे. आरजू कंपनीची व्याप्ती एवढी मोठी आहे की, कंपनीचे दिल्लीत गोदाम असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे. www.konkantoday.com