प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा -सुनील चव्हाण

रत्नागिरी :- निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी 02 ऑक्टोबर रोजी जिल्हयाभरात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याला अनुपस्थित राहिल्यास लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वये थेट गुन्हे दाखल करा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.नोडल ऑफीसर्सच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आयोजित बैठकीत दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक २०१९ साठी गठीत करण्यात आलेल्या आचारसंहिता अमलबजावणी समिती, कायदा व सुव्यवस्था समिती, मनुष्यबळ व्यवस्थापक समिती, मतपत्रिका छपाई व टपाल मतपत्रिका व्यवस्थापन समिती, प्रशिक्षण व्यवस्थापन समिती, EVM-VVPAT व्यवस्थापन समिती, सपंर्क समिती व दळवळणआराखडा समिती आदि समितींच्या कामकाजाचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button