आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त रविवारी वेदमूर्ती भाटवडेकर यांचे व्याख्यान
रत्नागिरी झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा आणि रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. वैशाख शुक्ल पंचमीला अर्थात येत्या रविवारी १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यात वक्ते वेदमूर्ती सचिन भाटवडेकर आद्य शंकराचार्यांचे व्याख्यान देणार आहेत.www.konkantoday.com