
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील मतदान आटोपले,कोकण रेल्वेला गर्दी उसळणार
उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनीची मुंबईहून गावाला येण्यासाठी तर गावाकडून मुंबईकडे जाण्यासाठी लगबग सुरू झालेली असतानाच लोकसभेसाठी ७ मे रोजी होणार्या मतदानामुळे नियोजन लांबणीवर पडले होते. मात्र मंगळवारी मतदान प्रक्रिया आटपल्यानंतर बच्चेकंपनी कुटुंबियांसह ८ मेपासून उन्हाळी सुट्टीच्या सफरीवर निघणार आहेत. लग्नसराईसह जत्रोत्सवामुळे कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल विक्रमी गर्दीने धावत आहेत. सर्वच रेल्वेगाड्यांना उसळणार्या तुफानी गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने सुसज्जता ठेवली आहे.शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्ट्या पडताच सार्यांनाच उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावांसह मुंबईला जाण्याचे वेध लागतात. विशेषतः उन्हाळी सुट्टी हंगामात रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेवून रेल्वे प्रशासनानेही कोकण मार्गावर ३३२ उन्हाळी स्पेशलच्या फेर्या जाहीर करत चाकरमान्यांसह बच्चेकंपनीला दिलासा दिला आहे. www.konkantoday.com