
शहरातील मारुती मंदिर येथील विखारे यांचे घर फोडले
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे राहणारे संजय विखारे यांचे बंद घर अज्ञात चोरटय़ाने फोडले.विखारे हे आपल्या कुटुंबासह मुंबईला गेले होते .याचा फायदा घेत अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज उचकटुन घरात प्रवेश केला .घरातील कपाट फोडून त्यातील तीस हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा ६५हजार रुपयांचा ऐवज लांबविला . याबाबत पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com