पाणी टंचाईमुळे चाकरमान्यांनो गावी येऊ नका, कोंढेतील तो फलक चर्चेत
कोरोना काळात गावी येऊ नका, अशी साद चाकरमान्यांना घालण्यात आली होती. आता मात्र भीषण पाणी टंचाईमुळे पुन्हा एकदा तशीच विनवणी करण्याची नामुष्की स्थानिक ग्रामस्थांवर येवून ठेपली आहे. कळवंडे धरणाच्या रखडलेल्या दुरूस्तीमुळे पंचक्रोशीतील गावावर पाणीबाणीचे भयान संकट कोसळले आहे. विहिरींची पाणी पातळी घटली आहे. नद्यांमध्ये खडखडाट झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीची झळ आपल्या मुंबईस्थित बांधवांना बसू नये, यासाठी स्थानिक तरूणांनी त्यांना चक्क गावी येवू नका, असेच आवाहन केले आहे. पाणी टंचाईची भीषणता समोर मांडणारा असाच एक कोंढे येथील सूचना फलक चर्चेत आला आहे. www.konkantoday.com